उकाड्यानं हैराण झालेल्या घोड्याची चक्क स्विमिंगपूलमध्ये उडी

घोड्याला उन्हाळा सहन होईना... स्विमिंगपूलमध्ये उडी आणि चक्क लागला पोहायला  

Updated: Mar 24, 2022, 11:21 AM IST
उकाड्यानं हैराण झालेल्या घोड्याची चक्क स्विमिंगपूलमध्ये उडी title=

मुंबई : सध्या तापत्या उन्हामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. त्यात हवामानात सतत होणारा बदल... कधी पाऊस पडतोय...तर कधी इतकी गरमी वाढतेय घराबाहेर पडण्याचीही हिंमत होत नाहीये...उन्हाचे चटके प्राण्यांनाही बसू लागलेयत... अशा परिस्थितीत त्रस्त झालेल्या एका घोड्याने जे केलं ते पाहुन तुम्हीही हैराण व्हाल... घोड्याच्या या कृतीवर तुम्हाला देखीव विश्वास बसणार नाही... 

तुम्ही आजपर्यंत वेगानं धावणारा घोडा पाहिला असेल. पण हा घोडा तर चक्क स्विमिंगपूलमध्ये पोहोतोय. बिचारा उकाड्यानं हैराण झालाय...गरमी जरा जास्तच आहे... पारा 5, 40 च्या वर गेल्यामुळे या घोड्याला उन्हाळा सहन होईना... 

त्यामुळे त्रस्त झालेल्या या घोड्यानं थेट स्विमिंगपूलमध्येच उडी घेतलीय. घोड्याला पाहून  त्याचा मालकही हैराण झाला आहे. घोडा पोहतोय हे पाहून तो बुडू नये या भीतीपोटी दोन्ही बाजूला त्याला दोरखंडानं आधार दिलाय...मग काय हा घोडाही मनसोक्तपणे स्विमिंगपूलमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. 

विशेष म्हणजे हा घोडा इतका सहजपणे पोहोतोय की व्हिडीओ बघणाऱ्यालाही आश्चर्य वाटेल... आपण सायकल चालवताना ज्याप्रकारे पॅडल मारतो...तसंच हा घोडा पॅडल मारल्यासारखे पाय हलवतोय...पण, पाण्यात श्वास घेता येत नसल्याने डोकं पाण्याच्या बाहेर ठेवून पोहोतोय...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, गर्मीत घोडा स्विमिंगपूलमध्ये पोहतोय...मात्र आम्ही कुठे पोहोयचं? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.