नाटकांच्या तिकीटावरील जीएसटी दरात कपात होणार?

रसिक मराठी मनासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत नाटकांच्या तिकीटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 18, 2018, 10:50 AM IST
नाटकांच्या तिकीटावरील जीएसटी दरात कपात होणार? title=

नवी दिल्ली : रसिक मराठी मनासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत नाटकांच्या तिकीटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 

जीएसटी लागू झाल्यापासून रंगभूमीच्या व्यवसायात गुंतवलेल्या सर्वांनीच याविषयी मागणी लावून धरली होती. आजच्या जीएसटीच्या बैठकीत ही मागणी केली होती. ज्या नाटकांचे दर अडीचशे रुपयांच्या आत होते, त्यांच्यावर जीएसटी लागू होत नसे, आता नव्या नियमानुसार हा तिकीटाच्या किमतीची मर्यादा 500 रुपयांवर नेली जाण्याची शक्यता आहे.