देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला रेमंड ग्रुप अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतम सिंघानिया यांच्या वडील विजयपत सिंघानिया यांच्याशी वाद असो किंवा पत्नी नवाज मोदी यांच्यासोबतचं घटस्फोटाचं प्रकरण असो. काही दिवसांपूर्वी गौतम यांनी वडिलांसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तब्बल 9 वर्षांनी ते एकत्र दिसली होती. त्यानंतर नुकताच गौतम यांनी वडील विजयपत सिंघानिया यांचा तरुणपणीचा फोटो शेअर केला. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलाय.
खरंतर विजयपत सिंघानिया यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एकेकाळी ते मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा आणि अनिल अंबानी यांच्यापेक्षा श्रीमंत होते. मुकेश अंबानी यांच्या अँटिलियापेक्षा मोठं घर होतं, पण आज ते गरिबीचे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे ना घर आहे ना गाडी. मग नेमकं झालं, तरी काय त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
संपूर्ण रेमंड साम्राज्याचे नेतृत्व करणारं विजयपत सिंघानिया हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचं काका जीके सिंघानिया यांच्या निधनानंतर सिंघानिया यांनी रेमंडचं नेतृत्व स्वीकारलं. विजयपत सिंघानिया हे लहान वयातच कौटुंबिक वादात अडकलं होतं. काकाच्या मृत्यूनंतर, रेमंडला सिंघानियाच्या इतर चुलत भावांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
रेमंडने शंभर वर्षांपूर्वी मुंबईतून प्रवास सुरू केला. 1900 मध्ये महाराष्ट्रातील ठाण्यात एक वूलन मिल होती, जिथे ब्लँकेट बनवले जात होते. नंतर तेथे लष्कराच्या जवानांसाठी गणवेश तयार केले जाऊ लागले. 1925 मध्ये मुंबईतील एका व्यावसायिकाने ही मिल विकत घेतली, मात्र काही वर्षांनी 1940 मध्ये कैलाशपत सिंघानिया यांनी ही मिल त्यांच्याकडून विकत घेतली. त्यांनी मिलचं नाव बदलून वाडिया मिलवरून रेमंड मिल केलं. राजस्थानमधून कानपूरला स्थलांतरित झालेले सिंघानिया कुटुंब जेके कॉटन स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स कंपनी चालवत होते. ब्रिटनमधून येणाऱ्या कापडाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी आता रेमंड मिलचा वापर केला.
कैलाश सिंघानिया यांनी फॅब्रिकवर लक्ष केंद्रित केलं आणि स्वस्त कपडे बनवायला सुरुवात केली. 1958 मध्ये त्यांनी मुंबईत पहिलं रेमंड शोरूम उघडलं. 1960 मध्ये त्यांनी परदेशी मशीन्स आयात केल्या आणि त्यापासून कपडे बनवायला सुरुवात केली. 1980 मध्ये रेमंडची कमान विजयपत सिंघानिया यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी कंपनीची जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळली आणि रेमंडचा विस्तार सुरू ठेवला. 1986 मध्ये सिंघानिया यांनी फॅब्रिक व्यवसायासोबत पार्क अव्हेन्यू हा परफ्यूम ब्रँड लाँच केला. देशाबरोबरच परदेशातही विस्तारावर त्यांचा भर होता. 1990 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी भारताबाहेर पहिलं शोरूम उघडलं.
विजयपत सिंघानिया यांनी 2015 मध्ये त्यांचा मुलगा गौतम सिंघानियाकडे रेमंडची कमान सोपवली होती. त्यांनी आपले सर्व शेअर्स आपल्या मुलाच्या नावावर हस्तांतरित केलं. त्यावेळी त्या शेअर्सची किंमत 1000 कोटी रुपये होती. गौतम यांनी कंपनीचा पदभार स्वीकारताच त्याचं खरं रुप दाखवायला सुरुवात केली. वडील आणि मुलाचं नातं दिवसेंदिवस बिघड होते. एका फ्लॅटवरून दोघांमध्ये एवढा वाद झाला की प्रकरण कोर्टात पोहोचलं. फ्लॅटचा वाद इतका वाढला की मुलाने वडिलांना घराबाहेर हाकलून दिले. विजयपत सिंघानिया यांनी मुंबईतील एका पॉश भागात जेके हाऊस नावाचं आलिशान घर बांधलं. मात्र त्यांच्या मुलाने त्यांना त्या घरातून बाहेर काढलं आणि भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडलं.
रेमंडला घरोघरी नेणाऱ्या व्यक्तीला स्वत: बेघर व्हावं लागलं. त्यांची कंपनी आज खूप उंचीवर आहे, पण विजयपतचे तारे अधोगतीकडे आहेत. जे एकेकाळी खासगी विमानांमध्ये उड्डाण करायचे, त्यांच्याकडे आज गाडीही नाही. रेमंडचे संस्थापक विजयपत सिंघानिया यांनी स्वत: कबूल केले की सर्व मालमत्ता आणि संपूर्ण व्यवसाय आपल्या मुलाकडे सोपवून आपण सर्वात मोठी चूक केली होती. एकेकाळी 12,000 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असलेले आज दक्षिण मुंबईतील ग्रँड पारडी सोसायटीत भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडलंय. मुलाने त्याच्याकडून कार आणि चालक हिसकावून घेतलीय.
बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया म्हणाले की, त्यांनी सर्वकाही त्यांच्या मुलाकडे सोपवलं. त्यांनी मला कंपनीचा काही भाग देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र नंतर तेही फेटाळलं. आपल्या वडिलांना रस्त्यावर पाहून मुलाला खूप आनंद झाला असेल असे ते म्हणालेत. त्यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया याला राग, लोभी आणि गर्विष्ठ व्यक्ती असंही या मुलाखतीत म्हटलं.