मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Updated: Jan 30, 2022, 08:51 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही खास प्लॅन केले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार डाऊन मार्गावर त्याचसोबत हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सेंट्रल रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार या डाऊन मार्गावर सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते 3 वाजून 55 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना रेल्वेचं टाईमटेबल बघून बाहेर पडा.

दुसरीकडे हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी या मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते सांयकाळी 4 वाजून 5 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

कोयना एक्सप्रेस रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कोल्हापूरला सुटणारी कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आली आहे.