सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

गॅस गळती रोखण्यात यश आलंय

Updated: Aug 11, 2018, 08:29 AM IST
सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी  title=

नवी मुंबई : नवी मुंबईत सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. या महामार्गावर टँकरमधून गॅस गळती झालीय. सानपाडा पुलावर साडेतीन वाजता ही घटना घडलीय. अतिज्वलनशील गॅस असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली. 

या घटनेनंतर विशेष पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. दरम्यान ही गॅस गळती रोखण्यात यश आलंय.