close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक बंद

विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली.

Updated: May 26, 2019, 10:24 PM IST
मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा रात्री साडे आठच्या सुमारास विस्कळीक झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकल मध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्णत: ठप्प झाली. 

अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाश्यांना ट्रेनमधून उतरून कुर्ला स्थानक पायी गाठावे लागले. त्यानंतर धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. लोकलमधूम अचानक धूर येऊ लागल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.