मुंबई : मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातला आणखी एक अ़डथळा दूर झालाय. बीकेसी आणि धारावी इथल्या तिवरांची झाडं तोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला परवानगी दिलीय.
मुंबईला मेट्रोची आवश्यकता असून मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण करणं बरोबर नाही. धावत्या मुंबईतल्या गर्दीवर तोडगा म्हणून मुंबईला मेट्रो गरजेची आहे, असं न्यायालयानं म्हटलंय.
मुंबई मेट्रो तीनसाठी सीआरझेड अंतर्गत धारावी आणि बीकेसी इथली तिवरांची झाडं तोडावी लागणारेत. यासंबंधी मुंबई मेट्रो तीन प्राधिकारणाने परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानुसार सर्व्हे केला असता बीकेसी इथं 108 तिवरांची झाडं तोडावी लागणार आहेत. तर धारावी इथल्या तिवरांचं पुनर्रोपण करण्यात येणार, असं आश्वासन मेट्रो रेल प्राधिकरणानं न्यायालयात दिलंय.
'मेट्रो ३'साठी सरकारनं जपानकडून कर्ज घेतलंय, झाडं तोडण्याच्या कामात विलंब होत असल्याने कर्जावरील व्याजाचा आकडाही वाढत चालल्याचं प्राधिकरणानं न्यायालयात म्हटलंय.