कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे.   

Updated: Jan 6, 2023, 07:06 AM IST
कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा  title=
Trending News nita ambani tina ambani kokilaben ambani viral video on Social media

Nita Ambani : देशातील सर्वात श्रीमंत आणि मोठं उद्योगपती रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्यांची मुलगी इशा अंबानी (Isha Ambani) हिला जुळी मुलं झाली. या मुलांचं भारत मोठ्या थाट्यामाट्यात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर धाकट्या मुलाचा साखपुडा...अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Rashika Merchant)  यांच्या नात्याला नवीन सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी छोटे अंबानी म्हणजे पृथ्वी अंबानीचा (Prithvi Ambani) 2 वाढदिवस मोठ्या जोरात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रेटींची हजेरी लक्षवेधी ठरली. 

अंबानी कुटुंब एकत्र

अशातच नीता अंबानी (Nita Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. या व्हिडिओमध्ये कोकिलाबेन (kokilaben ambani) यांच्यासोबत अख्ख अंबानी कुटुंब (Ambani family) एकत्र दिसलं. अनेकांना हे माहिती आहे धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या जाण्यानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद झाला. आज या दोघां भावांमध्ये दुरावा आला आहे. अशातच कोकिलाबेनसोबत नीता अंबानी आणि टीना अंबानी यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतं आहे.  (Trending News nita ambani tina ambani kokilaben ambani viral video on Social media )

काय व्हिडिओमागील सत्य

अंबानी कुटुंबातील महिला नीता अंबानी असो किंवा टीना अंबानी या त्यांच्या राजेशाही थाट आणि फॅशनमुळे कायम चर्चेत राहतात. त्याशिवाय हे कुटुंब अजून एका कारणामुळे चर्चेत असतं ते म्हणजे आजच्या काळातही त्यांनी जपलेली संस्कृती आणि चालीरीती...अंबानी कुटुंबात कोणताही प्रसंग असो ते तो क्षण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असाच एक क्षण साजरा केला जातो आहे. 

हे होतं निमित्त...

हा व्हिडिओ कोकिला बेन यांच्या वाढदिवसाचा आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी आणि टीना अंबानी एकत्र दिसल्या आहेत. या दोघी जावा खूप क्विचतच एकत्र दिसतात. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडिओ जुना असून कोकिला बेन यांचा 24 फेब्रुवारी 2020 मधील आहे. या प्रसंगी अंबानी हाऊस अँटिलियामध्ये श्रीमद भागवत गीताचं पठण ठेवण्यात आलं होतं. अंबानी कुटुंबाचा भगवान श्रीकृष्णावर ठाम विश्वास आहे आणि त्यांचं अनुसरण करतात. शिवाय श्रीकृष्णाला छप्पन भोगांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. 

या सोहळ्यात अंबानी कुटुंबातील महिला पारंपरिक वेशभूषेत दिसल्या. लेहेंगा आणि हेवी ज्वेलरीमध्ये त्यांचं रुप अधिकच उजळून दिसतं होतं. कोकिला बेन यांच्या वाढदिवसानिमित्त कथेची सांगता होऊन देवाची आरती करण्यात आली.