मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीमध्ये जी 'डायरी' सापडली होती त्यात मातोश्री' शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख 'केबलमॅन' असून दुसरी व्यक्ती 'महिला' असल्याची माहिती मिळते आहे.
जाधव यांच्या डायरीत 'केबलमॅन' अशा एका नावाचा उल्लेख आहे. या नावापुढे त्यांनी 75 लाख, 25 लाख आणखी 25 लाख असे एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे, आणखी एक नाव 'M-TAI' असं लिहिलेलं असून त्यापुढे 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे.
या दोन लोकांविषयी आयकर विभागाकडून माहिती मिळवली जात आहे. लवकरच या दोघांनाही आयकर विभागाकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. त्यातील एकजण मंत्रीपदावर (केबलमॅन) आहेत तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. या महिला नेत्या (M-TAI) मुंबई महापालिकेत आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात, अशी सगळीकडे चर्चा आहे.
बातमीचा व्हिडिओ