मुंबई : मुंबईत आणखी दोन खाजगी कोचिंग क्लास शिक्षकांना 10 वी बोर्डाच्या पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे . साकीनाकातील एका शाळेतील विद्यार्थ्यांकडे विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्या वीस मिनिटे अगोदर त्यांचा मोबाइलमध्ये असल्याचा त्याच शाळेतील एका शिक्षिकेला संशय आला आणि हि बाब तिने पोलिसांना कळवली.
त्यांनंतर या पेपरफुटी प्रकरणात सकिनाका पोलिसांनी या बाबत चौकशी करून दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांना काल अटक केली आहे. या दोन खाजगी कोचिंग क्लास चालविणाऱ्या शिक्षकांकडून हि प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडे आल्याच समोर आलं.
यामध्ये फिरोज अन्सारी ह्या सकिनाका भागात कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकला तर दुसरा मुज्जमिल काझी हा मीरा रोड भागात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल अटक केली आहे.मात्र, ह्या प्रश्नपत्रिका ह्या दोघांकडे कश्या आल्या ? याबाबत सकिनाका पोलिसांची चौकशी सुरु आहे.