वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचा यू टर्न

राज्यातील जनतेला दिलासा नाही.

Updated: Nov 17, 2020, 12:22 PM IST
वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचा यू टर्न title=

दीपक भातुसे, मुंबई : वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसे महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावा लागते, विविध चार्जेस द्यावे लागतात. बिलाचे हप्ते पाडुन देण्यात आले, पूर्ण बिल भरणार्‍यांना २ टक्के सवलतही दिली आहे. लोकांच्या तक्रारींचे निवारणही आम्ही केले आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले, पण केंद्र सरकारने यात मदत केली नाही.

६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.