मुंबई: गणपतीसाठी कोकणात मुंबईतून चाकरमनी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या चाकरमन्यांना कोकणात येण्यापासून रोखणे अयोग्य ठरेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
कोकणात यापूर्वीच जवळपास २,९५,००० चाकरमनी दाखल झाले आहेत. गेल्या पाच दिवसांत कोकणात १५ हजार चाकरमनी आले आहेत. त्यांची स्थानिक प्रशासनाकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांना कोकणात येऊन देऊ नका, असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून कोकणात विशेष एसटी सोडण्यात येणार आहेत. एसटीकडून एकूण ५५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. एका एसटीमध्ये २२ प्रवासी असणार आहेत.