राज-पवार मुलाखतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2018, 02:27 PM IST
राज-पवार मुलाखतीवर उद्धव ठाकरे म्हणाले... title=

मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, मी ही मुलाखत चोरूनही बघितलेली नाही, असं सांगून त्यांनी आपण ही मुलाखत पाहिली नसल्याचं सांगितलं.

आर्थिक निकषांवर आरक्षण आणि पवार

शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वीच हीच भूमिका घेतली होती. मात्र मंडल आयोगाचं भूत दाखवून त्यावेळी सेना फोडण्याचा प्रयत्न झाला.

तेव्हा बाळासाहेबांविषयीची आपुलकी कुठे गेली होती?

२००० साली बाळासाहेबांना अटक कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला? तेव्हा आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल शरद पवारांना बाळासाहेबांविषयीची आपुलकीवर केला आहे.

तर आज जातीपातीच्या भिंती नसत्या - उद्धव ठाकरे

आरक्षणावर बाळासाहेबांनी या आधीच भूमिका मांडली होती, आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं असतं, तर आज जातीपातीच्या भिंती नसत्या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पवारांना बाळासाहेब आणि शिवसेना समजायला ५० वर्ष गेली

पवारांनी जी काही मतं मांडली, ती बाळासाहेबांनी ५० वर्षापूर्वी मांडली होती, पवारांना बाळासाहेब आणि शिवसेना समजण्यासाठी ५० वर्ष गेली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

शिवसेना अजूनही अनेकांना समजलेली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली त्यावर लगावला आहे.