मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. यावरून महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांकडून एकमुखानं मंजुरी मिळाली आहे. मुंबईत हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्व पक्षाचे नेते बैठकीला जमले आहेत, या बैठकीत उद्धव ठाकरे यांची निवड झाली.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 1 डिसेंबर 2019 रोजी रविवारी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पुढचे नवे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे.