भXXचा अर्थ संजय राऊत यांना कळतो का? घोटाळा उघड केल्याने शिवीगाळ

उद्धव ठाकरे संजय राऊतांमार्फत शिवीगाळ करतायत, किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Updated: Feb 21, 2022, 01:26 PM IST
भXXचा अर्थ संजय राऊत यांना कळतो का? घोटाळा उघड केल्याने शिवीगाळ title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तसंच त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे चुxx लोक नाहीसे होतील, हा कोण आहे याला आम्ही ओळखत नाही असे चुXX देशात खूप आहेत अशा  शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.

यावर आज किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यानं गेल्या दहा दिवसात इतकी शिवीगाळ केली आहे, पण संजय राऊत यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाहीए, ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे असा निशाणा किरीट सोमय्या यांनी साधला आहे. 

भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का, माझ्या बायकोला जाऊन विचार, माझ्या आईला जाऊन विचार, माझी बायको मराठी आहे, माझी सून महाराष्ट्रीयन आहे. अशा प्रकारच्या शिवीगाळ करतायत, का तर मी त्यांचे घोटाळे उघड करतोय म्हणून असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

'सचिन वाझे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते'
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं, सचिन वाझे सारखा महान व्यक्ती नाही देशात, सगळ्यात प्रामाणिक ऑफिसर आहेत, कारण सचिन वाझे म्हणजे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत. 

११ ऑक्टोबर २०२१ रोजी संजय राऊत यांनी मला पत्र लिहिलं होतं,  भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिक रित्या उघड केली आहेत. आपण केलेल्या तपासाकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावं लागलं. भ्रष्टाचारविरुद्धच्या लढ्यात बळ मिळावं, असं संजय राऊत यांनी या पत्रात म्हटलं होतं.

आता मला हे विचारचं आहे, की शिवसेनेला नेमकं म्हणायचं काय आहे? आधी माझ्या कामाचं कौतु करायचं आणि आता चार महिन्यात मुख्यमंत्री म्हणतात किरीट सोमय्यांचा इलाज करावा लागणार. या संबंधी उद्धव ठाकरे स्पष्टता करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. 

'जमीन खरेदी केल्याची कागदपत्र'
2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं, त्यात म्हटलं होतं आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय नाईक यांची जागा खरेदी केली असून यातील रश्मी ठाकरे म्हणताय, हे घर आमच्या नावे करुन सहकार्य केल्यास, मी आपले ऋणी राहणार, यात मनिषा वायकर यांचं नावही आहे, असं सागंत किरीट सोमय्या यांनी कागदपत्रही पत्रकार परिषदेत सादर केली.

उद्धव ठाकरे आता कुठे आहेत. हे पत्र कोर्लई ग्रामपंचायतीने दिलेलं आहे. किरीट सोमय्यावर जे तुम्ही आरोप केले त्याचा हिशोब देणार आहे, पण तुमचाही हिशोब घेणार आहे, असं आवाहन सोमय्या यांनी दिलं आहे. 

महाराष्ट्राची साडेबारा कोटी जनता बोलतेय मुख्यमंत्री अशा प्रकारे चिटिंग करतायत,  शिवसेनेची अडचण ही आहे की जी कोविड हॉस्पीटल घोटाळा उघड झाला, त्याचा हिशोब देण्याची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात हिम्मत नाही.  किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकणार ही जी भाषा सुरु आहे कारण कोविड हॉस्पीटल घोटाळ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अडकतायत म्हणून, अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.