Aryan Khan Drugs Case : तुरूंगात कैदी-नातेवाईकाची भेट नक्की होते तरी कशी?

शाहरुख आणि आर्यनच्या भेटीनंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Updated: Oct 21, 2021, 11:50 AM IST
Aryan Khan Drugs Case : तुरूंगात कैदी-नातेवाईकाची भेट नक्की होते तरी कशी?  title=

मुंबई : मुलाच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 18 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या मुलाल भेटण्यासाठी शाहरुख अखेर पहिल्यांदा आर्थर जेलची पायरी चढला.  या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. शाहरूख आणि आर्यनच्या भेटीमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली. दरम्यान शाहरुख आणि आर्यनच्या भेटीनंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी तुरूंगातील नियम आणि भेट कशी होते हे सांगितलं आहे. 

उज्वल निकम म्हणाले, 'एका बापाने आपल्या मुलाला तुरूंगात भेटावं यात नवीन असं काही नाही. किती वेळ भेट झाली, या भेटीत काय चर्चा झाली याची कोणालाही कल्पना असणं शक्य नाही. कारण अशा भेटी जेल प्रशासनाच्या नियमानुसार कैद्याला मागण्याचा आणि तुरूंग प्रशासनाला भेट देण्याचा नियमानुसार हक्क आहे.'

शिवाय हायप्रोफाईल केस असल्यामुळे प्रसारमाध्यमांकडून प्रकरणाला प्रसिद्धी दिली जात असल्याचं देखील ते म्हणाले. 'तुरूंग प्रशासन जेव्हा भेटीसाठी परवानगी देतो. तेव्हा कैदी आणि नातेवाईक अशा ठिकाणी उभे असतात तेथून कोणाला काही ऐकू येत नाही. पण ही भेट  तुरूंग प्रशासनाच्या समक्ष  घेतली जाते. तेव्हा या भेटीत वकील किंवा आई-वडील किंवा नातेवाईक असू  शकतात. 

पण ही भेट प्रशासनासमोरचं झालं पाहीजे असा नियम आहे. त्यांच्या भेटीवर प्रशासनाचं लक्ष असतं. असं देखील उज्वल निकम म्हणाले. दरम्यान, आर्यन खानच्या जामिनाकरता शाहरूख खानने हायकोर्टात धाव घेतली आहे. NDPS कोर्टाच्या आदेशाविरोधात अर्ज दाखल करण्यात आला आहे.  आज यावर सुनावणीची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता ही सुनावणी मंगळवारी होणार आहे.