उल्हासनगरमध्येही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली यापाठोपाठ आता राज्यातल्या आणखी एका शहरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 

Updated: Jul 11, 2020, 09:42 PM IST
उल्हासनगरमध्येही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

उल्हासनगर : पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली यापाठोपाठ आता राज्यातल्या आणखी एका शहरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये आता २२ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन कायम असेल. याआधी इतर महानगरांप्रमाणेच उल्हासनगरमध्येही १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन होता. पण कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता उल्हासनगरच्या महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये आधीप्रमाणेच सगळे नियम लागू असतील. 

त्याआधी काल पुणे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांनीही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये १९ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन कायम असेल. तर पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १४ जुलैपासून १० दिवसांसासाठी जिल्हा लॉकडाऊन करण्यात येईल.