मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (underworld don dawood ibrahim) भाऊ इक्बाल कासकरला (iqbal kaskar) एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या जेलमध्ये होता.
काश्मिरवरुन मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ मुंबईत आणले जात होते. याप्रकरणी एनसीबीने कारवाई करत जवळपास 25 किलो चरस पकडला होता. या प्रकरणाची कारवाई करताना वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागले. ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.
ठाणे खंडणीविरोधी पथकाने 19 सप्टेंबर 2017 मध्ये नागपाडय़ातील घरातून इक्बालच्या मुसक्या आवळल्या होत्या. खंडणीसाठी बिल्डरांना धमक्या दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.