close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सिद्धीविनायकाचरणी ७५० किलोचा 'महामोदक'

 गेली दोन वर्षे ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 3, 2017, 08:45 AM IST
सिद्धीविनायकाचरणी ७५० किलोचा 'महामोदक'

मुंबई : सिद्धीविनायकाचरणी असलेला ७५० किलोचा मोदक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा मोदक पाहण्यासाठी आणि मोदकासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत होती. गेली दोन वर्षे ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. 
 प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथून सिद्धिविनायक मंदिराकडे हा महामोदकआणण्यात आला. या दरम्यान प्रभादेवी येथील रस्त्यावर आणि सिद्धिविनायक मंदिर परिसरात महामोदक पाहण्यासाठी व त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. 
दरवर्षी मी हा मोदक घेऊन श्रीसिद्धिविनायक मंदिरात येतो आणि हा मोदक मंदिर समितीकडे देतो. यंदा मी बाप्पाच्या कृपेने न्यासचा अध्यक्ष झालो असून, याचा मला आनंद होत असल्याचे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले. 
या वेळी झालेल्या कार्यक्रमात परिवहनमंत्री दिवाकर रावते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सुशांत शेलार उपस्थित होते.

कसा तयार झाला महामोदक ?

हा महामोदक तयार करण्यासाठी आधी काहि दिवस जय्यत तयारी सुरू होती. दूध, साखर आणि माव्याच्या सहाय्याने हा महामोदक तयार करण्यात आला आहे. महामोदक तयार करण्यासाठी १५ आचारी ९ दिवस काम करत होते. दहा फूट उंचीच्या मोदकाचा साचा तयार करण्यासाठी ८ दिवस लागले.