Mumbai Local Train : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईफ लाईन समजली जाते. मुंबई लोकलने लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांना वेगवेळ अनुभव येतात. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये किळसवाणे दृष्य पाहून प्रवासी प्रचंड चिडले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ लोकलमध्ये वापरलेला कंडोम आढळला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
mazdur नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 23 जानेवारी रोजी mazdur या अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आले. या ट्वीटमध्ये प्रवाशाने मध्य रेल्वे मुंबई विभाग, रेल्वे मंत्रालयालाही टॅग केलं आहे. 9.40 अंबरनाथ स्लो ट्रेनमधलं हे दृष्य आहे. ट्रेन नुकतीच करी रोड स्टेशनवरून निघाली आहे, अस या प्रवाशाने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. पहिले ट्विट केल्यानंतर या व्यक्तीने डोंबिवली स्थानकात आल्यावर दुसरे ट्विट केले. डोंबिवली स्टेशन आले तरी हा वापरलेला कंडोम इथेच आहे असं ट्विट त्याने केले.
Well, what a sight. A used condom. Hello @drmmumbaicr, @RailMinIndia, @Central_Railway.This is 9.40 #Ambernath slow local. Trainhas crossed #CurreyRoad. @mumbairailusers. pic.twitter.com/C9tzNVB0Qf
— mazdur (@cinemaausher) January 23, 2023
या फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पासून मुंबई लोकलने प्रवास करणारे प्रवासी संतापले आहेत. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला असून रेल्वे प्रशासानाने तात्काळ यावर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. अनेक प्रवाशांनी य़ा ट्विटवर रिप्लाय करत आपला संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या ट्विटला रिट्विट केले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानकांमध्ये CCTV कॅमेरे बसवले आहेत. लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात देखील CCTV कॅमेरे बसण्यात आले आहेत. हा फोटो पाहून प्रवाशांनी सर्व डब्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.