माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबईतल्या ओशिवरा येथील 'तुळशी को सहकारी गृहनिर्माण संस्थे'साठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आरक्षण बदलल्याप्रकरणी निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

Updated: Jul 14, 2017, 11:20 PM IST
माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंविरुद्ध एफआयआर दाखल   title=

मुंबई : मुंबईतल्या ओशिवरा येथील 'तुळशी को सहकारी गृहनिर्माण संस्थे'साठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आरक्षण बदलल्याप्रकरणी निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

खोटे साक्षीदार उभे करून, गृहनिर्माण भूखंडांचे आरक्षण अनिवासी केल्याचं एसीबीच्या तपासात आढळलंय, त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यांच्यासह अनिल वेलिंग, श्यामसुंदर शिंदे, संजय सिंह, म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष सोनवणे, वास्तुशास्त्रज्ञ दीपक मंडेलकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खोब्रागडे यांनी म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष असताना आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन ओशिवरा येथील निवासी भूखंड 'अनिवासी' केल्याचा ठपका एसीबी चौकशीत ठेवण्यात आलाय. 

खोब्रागडे यांची सनदी अधिकारीपदाची कारकीर्दच अनेकदा वादग्रस्त ठरली होती. आदर्श सोसायटीत मुलीसाठी सदनिका मिळवून दिल्याचा ठपका त्यांच्यावर होता. तर बेस्टमध्ये असताना किंगलाँग बस खरेदीवरही आक्षेप घेण्यात आला होता.