मोठी बातमी : शनिवारपासून एपीएमसी मार्केट सुरू होणार

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. 

Updated: Mar 25, 2020, 04:21 PM IST
मोठी बातमी : शनिवारपासून एपीएमसी मार्केट सुरू होणार title=
संग्रहित छायाचित्र

वाशी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच याचं वाढतं संक्रमण टाळण्यासाठी सर्वत्र काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली. याच पावलांअतर्गत वाशी येथील एपीएमसी मार्केटही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन होण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाही वाशी येथील एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरु होणार आहे. 

टप्प्याटप्पाने हे मार्केट सुरु होणार आहे. त्यामुळे जीवनावशअय वस्तूंच्या यादीतील या गोष्टींबाबत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परराज्यातून येणारं सर्व सामान, उत्पादनं सुरक्षित येण्यासाठी पोलीसांचं सहकार्य घेतलं जाणार आहे. 

मार्केटमध्येही कोरोना फोफावणार नाही, यासाठीदेखील काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत बाजार समितीकडून सॅनिटायझर, टेंम्प्रेचर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोहोचवण्यात येणार आहे. 

 

मार्केट सुरु होणार असं तरीही येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. ज्या कारणी मार्केट हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर बाजार समितीचे स्टीकर्स लावण्यात येणार आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता कोकण आयुक्तांच्या निरिक्षणाअंतर्गत वॉर रूम तयार करण्याचं कामही सुरू आहे. एकंदरच जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू नये सोबतच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू नये यासाठीच उचलण्यात आलेलं हे एक मोठं पाऊल आहे.