मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

इएसआयसी रुग्णालय परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. याची तक्रार पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली. मात्र, 10 तास उलटून गेले तरी पालिका कर्मचारी या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणीगळती सुरूच होती.

Updated: Jun 6, 2017, 05:27 PM IST
मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया title=

मुलुंड : इएसआयसी रुग्णालय परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. याची तक्रार पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली. मात्र, 10 तास उलटून गेले तरी पालिका कर्मचारी या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणीगळती सुरूच होती.

तसंच पाणी वाया जात असल्यानं नागरिकही संतापले. दरम्यान, झी मीडियानं याची दखल घेताच तात्काळ पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं.