मुंबईत पहिल्याच पावसात ४१ ठिकाणी साचलं पाणी

सोमवारी रात्री कोसळलेल्या पहिल्याच पावसात ४१ ठिकाणी पाणी साचले.

Updated: Jun 14, 2017, 10:30 AM IST
मुंबईत पहिल्याच पावसात ४१ ठिकाणी साचलं पाणी title=

मुंबई : सोमवारी रात्री कोसळलेल्या पहिल्याच पावसात ४१ ठिकाणी पाणी साचले. मुंबई तुंबणार नसल्याचा दावा करणारे प्रशासन आणि सत्ताधारी याला जबाबदार असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आणूनही सत्ताधारी शिवसेना प्रशासनाला पाठीशी घातले. यामुळे पहिल्याच पावसात मुंबईत तुंबल्याची दिसून आल्याचे काँग्रेसनं म्हटलं आहे.

सोमवारी रात्री १० ते ११ या एक तासाच्या कालावधीत मध्य मुंबईत सुमारे ७० मिमी पाऊस लागल्यानं जागोजागी पाणी साचल्याचा खुलासा प्रशासनाने केला. हिंदमाता, दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा या परिसरात पाण्याचा निचरा होत नव्हता. तसंच सोमवारच्या पावसात मुंबईत विविध ठिकाणी 96 झाडे पडली. मान्सूनच्या सुरुवातीलाच पाणी साचण्याच्या घटनेमुळं विरोधकांच्या हातात टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.