यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होणार?

मुंबईत पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महानगर पालिका ठाम आश्वासन देत असते की या वर्षी पाणी तुंबणार नाही, नाले सफाई झाली असून मुंबईकराना त्रास होणार नाही. मात्र हा दावा फोल ठरला आहे. 

Updated: Jun 12, 2017, 09:06 AM IST
यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होणार? title=

मुंबई : मुंबईत पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महानगर पालिका ठाम आश्वासन देत असते की या वर्षी पाणी तुंबणार नाही, नाले सफाई झाली असून मुंबईकराना त्रास होणार नाही. मात्र हा दावा फोल ठरला आहे. 

रात्री झालेल्या एक तासाभराच्या पावसाने, असल्फा मेट्रो स्टेशनखाली दरवर्षी पाणी तुबंते तसे यावर्षी सुद्धा पाणी तुंबलंय. 

मेट्रो स्टेशनजवळ आलेल्या गटाराचं काम केले. मात्र ते ही अर्धवट आहे...त्यात सालाबादप्रमाणे नालेसफाईच्या नावानं बोंबच आहे. त्यामुळेच यावर्षीचे चित्र काही वेगळे दिसत नाही.