दीपक भातुसे / मुंबई : राज्यातील पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पाणी महागले आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आलाय. एक हजार लीटरला १६ रुपयांवरून १२० रुपये असा दर करण्यात आलाय.
झालेय. राज्यात पाणीपट्टीचे दर वाढवण्याचा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा दरात १७ टक्के वाढ होणार आहे. २०१० नंतर राज्यातील पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
औद्योगिक वापरासाठीच्या पाणीदरात ५० टक्के वाढ सूचविण्यात आली आहे. मीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका आणि महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे.
जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दोन पट दर द्यावा लागेल. पालिकांनी पिण्यासाठी पाणी घेऊन ते उद्योगांना पुरवल्यास तीन पट दर आकारण्यात येणार आहे. प्रवाही कालव्यावरील शेतकरी आणि उपसा योजनेवरील शेतकरी यांच्यातील पाणीपट्टी दरातील तफावत दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आता शासकीय उपसा सिचंन योजनेवरील शेतकऱ्यांना पाणीपट्टी आणि १९ टक्के वीज बिलाचा भार सोसावा लागणार आहे. प्रत्येकाला घनमापन पद्धतीने पाणीपट्टी द्यावी लागणार, जास्त पाणी वापरणाऱ्यांना जास्त पाणीपट्टी आणि कमी पाणी वापरणाऱ्यांना कमी पाणीपट्टी असणार आहे.
क वर्ग नगरपालिका ७० लिटर प्रती व्यक्ती
ब वर्ग नगरपालिका १०० लिटर प्रती व्यक्ती
अ वर्ग नगरपालिकांसाठी १२५ लिटर प्रती व्यक्ती
मुंबई महापालिका सोडून इतर महापालिका आहेत, ज्यांची लोकसंख्या पन्नास लाखापेक्षा कमी आहे त्यांना १३५ लिटर प्रती व्यक्ती असणार आहे. प्रताधिकारणाने दर वाढल्यामुळे आता नगरपालिका, महापालिका दर वाढणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ही दरवाढ १ फेब्रुवारी २०१८ पासून लागू होणार आहे. शेताच्या पाण्याचे दर मात्र वाढणारच आहेत.