Mumbai Police call Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली (Mumbai Police Notice to Urfi Javed Inquiry ). भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी  जावेद विरोधात सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. अधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात जवळपास दोन तास पोलिसांनी उर्फीची चौकशी केली. पोलिस चौकशीत उर्फीने काय माहिती दिली याचा तपशील आता समोर आला आहे. 

चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, तेव्हा  चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे केलीय. उर्फी जावेदनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जात ही विनंती केलीय. ट्टिटरच्या माध्यमांतून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याकडेही तीने महिला आयोगाचं लक्ष वेधलं. आपण लवकरच याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करु, त्यावर महिला आयोगाने कारवाईचे आदेश द्यावेत अशी विनंती तीने केल्याची माहिती मिळत आहे. 

चित्रा वाघ यांच्यावर कोणतेही कारवाई झालेली नाही. त्याआधीच उर्फी जावेदला चौकशीला सामोरे जाव लागल आहे. आंबोली पोलिसांनी उर्फी जावेदचा जबाब नोंदवला आहे. दोन तासानंतर उर्फी पोलिस ठाण्यातून बाहरे पडली. यावेळी माध्यमांनी तिची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती न बोलताच निघून गेली. मात्र, पोलिसांना दिलेला जवाबात उर्फी काय म्हणाली याचा तपशील समोर आला आहे. 

मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे घालते ते माझ्या आवडीने घालते.  माझे असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही अस उर्फी म्हणाली.

मी जे कपडे घालते ते माझ्या प्रोफेशन आणि कामाचा एक भाग आहे. माझ्या कामाच्या हिशोबाने मी कपडे घालते. त्यावरून माझं फोटोशूट होत असत. कधी कधी कामाची इतकी घाई असते की कपडे बदलण्याचा वेळ मिळत नाही. यामुळे तसेच बाहेर पडावे लागते  त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. यानंतर हे फोटो व्हायरल होतात ते मी कसे थांबवू असा जवाब उर्फीने  दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
What did Urfi Javed say in the police investigation
News Source: 
Home Title: 

Urfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद

Urfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Urfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, January 14, 2023 - 16:42
Created By: 
Vanita Kamble
Updated By: 
Vanita Kamble
Published By: 
Vanita Kamble
Request Count: 
1
Is Breaking News: 
No