मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय झालं, त्याची EXCLUSIVE माहिती फक्त झी २४ तासच्या हाती लागलीय... मातोश्रीवर बंद दाराआडच्या त्या भेटीत दोघांमध्ये काय संवाद झाला, हे फक्त झी २४ ने समोर आणलंय.. मुळात अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला शिवसेनेकडून भाजपवर होत असणारी टीका कारणीभूत ठरल्याची माहिती मिळतेय. बैठकीआधी ८ दिवस पालघर निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं भाजपवर केलेली टीका अमित शाह यांच्या निदर्शनास आली होती. त्याचवेळी शाह यांनी उद्धव यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली होती.
सार्वजनिकरित्या मतभेद वारंवार चव्हाट्यावर येणं युतीत दोन्ही राजकीय पक्षांसाठी चांगलं नसल्याचं अमित शाह म्हणाले होते. त्यावर या विषयावर समोरासमोर चर्चा करण्याचं या दोघांमध्ये ठरलं आणि अमित शाह यांच्या कार्यालयातून भेटीची वेळ नक्की करण्यात आली. ६ जूनला मातोश्रीवर ही भेट झाली.