एसटीची भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून...! तिकीट दरात १८ टक्के वाढ

१८ टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

Updated: Jun 15, 2018, 03:49 PM IST

मुंबई : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात उदया १६ जुनपासून (15 जूनच्या मध्यरात्रीपासून)  १८ टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे. यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील.

वादावादी थांबेल 

 ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे.