मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येचा शक्य त्या सर्व परिंनी तपास करण्याचं सुत्र सुरू झालं. सीबीआयपासून ते अगदी नार्कोटीक्स विभागापर्यंत साऱ्यांनीच कंबर कसून या प्रकरणीच्या तपासाची धुरा हाती घेतली. पाहता पाहता अशी काही धक्कादायक माहिती समोर येऊ लागली, की अनेकांच्याच भुवया उंचावू लागल्या.
सदर प्रकरणाचा तपास सुरु असतानाच अभिनेत्री कंगना राणौत हिनंही बी- टाऊनमधील काही आघाडीच्या कलाकारांची नावं घेत त्यांची ड्रग्ज टेस्ट करण्याच मागणी केली आहे. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे निलेश राणे यांची. कंगनाच्या ट्विटनं एकच खळबळ माजवलेली असताना आता निलेश राणे यांनी ट्विट करत थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निशाण्यावर घेतलं आहे.
'फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला, मला तर असं वाटतं की आदित्य ठाकरे यांचीसुद्धा ड्रग्ज टेस्ट करण्यात यावी. सरतेशेवटी बॉलिवूड वर्तुळाशी त्यांचंसुद्धा जवळचं नातं आहे', असं ट्विट राणे यांनी केलं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात वादळ येण्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. मुख्य म्हणजे यावर आदित्य ठाकरे यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
कंगनानं ट्विट करत नेमकं काय म्हटलं होतं?
'मी विनंती करते की रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्टसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने द्यावेत. या लोकांना कोकेनचं व्यसन असल्याची अफवा आहे. त्यांनी या अफवांचा भांडाफोड केला पाहिजे. त्यांच्या नमुन्यांमध्ये काहीच निघाललं नाही, तर ते देशातल्या अनेक तरुणांना प्रोत्साहित करतील', असं ट्विट कंगनाने केलं होतं. शिवाय तिनं करण जोहर आणि बॉलिवूडमधील इतर प्रस्थापितांवरही जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.