आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Updated: Mar 6, 2018, 09:13 AM IST
आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ? title=

मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनमध्ये आजही प्रशांत परिचारक निलंबनच्या प्रश्नावरून दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा

दरम्यान, या मुद्द्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी नवा कोणता मुद्दा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारी विधानसभेत धनंजय मुंडे ऑडियो क्लिप प्रकरणवरून सत्ताधारी यांनी विरोधकांवर पलटवार केला होता. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात कार्यक्रम पत्रिकेत भरपूर कामकाज जरी असलं तरी आरोप प्रत्यारोपात किती कामकाज प्रत्यक्ष होणार हे बघावे लागेल. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा असून विरोधकांनी केलेल्या टिकेबाबत सत्ताधारी यांनी आज उत्तर देणे अपेक्षित आहे. तसंच दोन्ही सभागृहांत गारपीट आणि शेतकरी कर्जमाफी या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

विविध विषयांवर चर्चा अपेक्षीत

विधानसभेत जनावरांचा लाळ खुरकूत रोग, द्राक्षचे दर या विषयांवर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा होणार आहे. तर विधानपरिषदमध्ये वैद्यकीय उपकरणे आणि छापील किंमतीचा प्रश्न, राज्यातील गुटखा बंदी, डहाणू इथली बोट दुर्घटना, राज्यातील दुधाच्या दराचा प्रश्न, नाणार रिफायनरी प्रकल्प या विषयांवर लक्षवेधी प्रश्नांच्या मार्फत चर्चा अपेक्षित आहे.