मुंबई : राज्यासह देशाच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहेत. सरकारने कोविड-19 चे (Covid-19) नियम कडक केले आहेत. मास्क (Mask ) घालणे आणि सोशल डिस्टनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लोक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचवेळी मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र, लोक कोरोनाच्या साथीबाबत फारच निष्काळजी दिसत आहेत. नियम पाळायचे नाही आणि कारवाई केली की धक्काबुक्की आणि मारहाण करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. मुंबईत(Mumbai) मास्क (Mask ) न घातलेल्या महिलेवर कारवाईचा बगडा उगरताच महिला आक्रमक झाली. तिने मुंबई पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केली. (Woman beaten up by BMC employee for not wearing Mask, video goes viral on social media)
आमची सहयोगी वेबसाइट 'इंडिया डॉट कॉम'च्या वृत्तानुसार मुंबईत Mask न वापरल्याचे विचारताच महिला चिडली आणि तिने मुंबई पालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आज पालिका कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. एका महिलेला मास्क का घातला नाही, असे विचारताच ही महिला चिडली आणि बीएमसीच्या महिला कर्मचार्यावर भडकली. या महिलेने बीएमसीच्या कर्मचार्याला धरत मारहाण केली.
हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने शूट केला होता आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. आता सोशल मीडियावर ही बाब चर्चेचा विषय झाली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने केवळ मारहाण केली नाही तर पालिका कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूकही दिली आणि शिवीगाळ केली. यावेळी तिने दावा केला की, मला चुकीच्या पद्धतीने पकडले. महिलेने म्हटले की, मला मारहाण करण्याबरोबरच तिला धमकावले. मात्र, यावेळी, महापालिकेचा कर्मचारी केवळ महिलेला थांबवताना या व्हिडिओत दिसत आहे.
मुंबई में महिला को मास्क पहनने को कहा तो हाथापाई शुरू हो गयी। महामारी फैलने का सबसे बड़ा कारण ऐसे ही लोग है। pic.twitter.com/ZqmfD9gDzz
— Jitender Sharma (@capt_ivane) March 19, 2021
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना रोखण्यासाठी लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. परंतु काही लोक अजूनही निष्काळजीपणा दाखवत आहेत. राज्यात 2833 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर देशात 40 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.