जागतिक कृषी पर्यटन दिन : 15 आणि 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेचं आयोजन

जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२१

Updated: May 14, 2021, 04:17 PM IST
जागतिक कृषी पर्यटन दिन : 15 आणि 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेचं आयोजन title=

मुंबई : भारत देशात महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे पहिले राज्य आहे. १६ मे हा दिवस "जागतिक कृषी पर्यटन दिन"  म्हणून आता जगभरात सर्वत्र साजरा केला जातो. त्या निमित्ताने  पर्यटन विभाग , महाराष्ट्र शासन आणि कृषी पर्यटन विकास संस्था बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने  "जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१" दिनांक १५ - १६ मे रोजी आभासी माध्यमाद्वारे आयोजित केली आहे. यंदाच्या परिषदेत “कृषी पर्यटन - महिला शेतकरी उद्यमशीलता विकास”  अशी थीम आहे.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेला अमेरिकेतील  ओरेगॉन , इलिनॉय , व्हरमाँट या राज्यांतून तसेच इटली , युगांडा , साऊथ आफ्रिका , फिलिपिन्स , स्कॉटलंड , स्पेन , थायलंड  या देशांतून शेतकरी , संशोधक , पर्यटन विशेष सल्लागार निमंत्रित केले आहेत. या परिषदेद्वारे कृषी पर्यटन विषयातील माहितीचा  व ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महिला  शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात केलेली भव्य कामगिरी  आपल्याला  दिसणार आहे.  आपल्या शेतकरी बंधू भगिंनीनी त्याचा फायदा घेऊन, आपल्या भागातील गरजू शेतकरी महिला मार्गदर्शन करून कृषी पर्यटन केंद्र सुरु करावीत. 

सदर आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद २०२१ समारंभात "जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहेत.  

जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार समितीच्या निर्णयानुसार यावर्षीचे जागतिक कृषी पर्यटन पुरस्काराचे मानकरी आहेत

१. मिनी मुर्रा फार्म - थायलंड - मिस चारिणी चॉयबलार्भ - १५ एकर मुर्रा म्हशींचा गोठा त्या  सांभाळतात. यातील  ४०० म्हशी भारतातून घेऊन निर्यात केलेल्या आहेत. आणि तिथे कृषी पर्यटन केंद्र  सुरु  करत त्यांनी  गावातील महिला शेतकरी यांना मुर्रा म्हशींचा गोठ्यातून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे 

२. लिपींग लाम्ब फार्म स्टे - ओरेगॉन राज्य , अमेरिका येथील  मिसेस स्कॉटी जोन्स वय ७० वर्ष, एकूण  ६७ एकर शेळ्या-मेंढ्यांचे शेत सांभाळतात. येथे  ६ खोल्या आहेत  आणि  पर्यटकांची  भरपूर  आवक असते.  

३. इंटरनॅशनल स्कूल ऑफ सस्टेनेबल टुरिझम - फिलिपिन्स  -   डॉ मीना गाबोर ७० वर्ष - माजी प्रधान सचिव पर्यटन , फिलिपिन्स सरकार- २०१४ मध्ये फिलपीन्स देशात कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात सिहांचा वाटा उचलला.  

४. हाईडआवे एक्सपीरेन्स बालकेलों फार्म्स स्कॉटलंड - कॅरोलिन मिल्लर -स्वतः कृषी पर्यटन केंद्र चालवतात तसेच  ‘ गो रूरल स्कॉटलंड’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी  कृषी पर्यटन विकास साधला आहे.  

५. ऍग्री टुरिझम साऊथ आफ्रिका -जॅककुई टेलर -  ऍग्री टुरिझम साऊथ आफ्रिका या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशात कृषी पर्यटन विकास त्यांनी मोलाचा वाटा  उचलला आहे. 
  
६. कोबाती - कॉम्युनिटी बेनिफिट टुरिझम - युगांडा - मारिया बर्यामुजूरा - पर्यटन आणि सामाजिक बांधीलकी माध्यमातून महिला बचत गट सथापन करून आर्थिक , सामाजिक विकस करीत आहेत.  

७. मेहेर कृषी पर्यटन केंद्र - सौ नंदा कासार , यवत पुणे , २७ एकर कृषी पर्यटन केंद्र चालवतात.  या  उपक्रमाद्वारे त्यांनी  ग्रामीण महिला बचत गट यांना रोजगार तसेच आर्थिक साधन उपलब्ध करून दिले.   

८. निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र मोरगाव बारामती - सौ संगीत भापकर - ५ एकर शेतीत कृषी पर्यटन केंद्र चालवतात.  

९. दीर्घायु कृषी पर्यटन केंद्र बिरवाडी शहापूर ठाणे - सौ डॉ अश्विनी कोटकर -यांच्याकडे  ४५ एकर आंब्याची बाग असून येथे  नैसर्गिक पद्धतीने  आंबे पिकवले जातात.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन देखील  आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे जागतिक कृषी पर्यटन पुरस्कारास पात्र ठरला आहे. महाराष्ट्र राज्य  कृषी पर्यटन  धोरण राबवणारे पहिले  राज्य  ठरले. इतकेच नव्हे तर या धोरणांतर्गत अनेक ग्रामीण भागातील शेतकरी पुरुष व महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.