मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवरून निखार जगदीश साहू हा तरुण समुद्रात पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्याचा शोध सुरू असताना दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळल्याचे आता समोर आले.
गुरूवारी सकाळी ही घटना घडली 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' असे या घटनेबद्दल बोलले जात आहे. हा आत्महत्येचा प्रकार होता की नजर चुकीने तो पडला याचा तपास पोलीस करत आहेत.
दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे हिल रोडवरून वांद्रे वरळी सिलिंक फिरण्यासाठी निखार ने टॅक्सी (एमएच ०३ एएक्स ०३७८) पकडली. सी-लिंक फिरून पुन्हा हिलरोडकडे सोडण्याबाबत त्याने टॅक्सीचालकाला सांगितले.
दरम्यान निखार साहूकडे सापडलेल्या आधार कार्ड वरून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रुको जरा.. मुझे फोटो निकालना है...’असे त्याने टॅक्सीचालकाला सांगितले.
टॅक्सी पुढे लावून टॅक्सीचालकाने मागे पाहिले असता साहू गायब असल्याचे त्याला समजले. त्याने लगेच यासंबंधी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी लागलीच निखार साहूचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान दोन तासांनतर दादर चौपाटीच्या किनाऱ्याजवळ तो बेशुद्धावस्थेत सापडला.
प्रकृती स्थिर झाल्यावर त्याचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.