'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन

झी २४ तासच्या अत्याधुनिक कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 1, 2017, 08:25 PM IST
'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन title=

मुंबई : मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी झी २४ तासच्या अत्याधुनिक कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले, यावेळी झी समूहाचे पुनीत गोयंका देखील उपस्थित होते.

मराठी चॅनेल्समध्ये सर्वात आधुनिक, आणि भव्य स्टुडिओ आणि न्यूजरूम आता झी २४ तासकडे आहे, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं. झी २४ तास हे फक्त चॅनेल नसून एक सामाजिक कार्यात सहभागी होणारे चॅनेल आहे, याचा आपल्याला अभिनान असल्याचं पुनीत गोयंका यांनी म्हटलं आहे.

झी २४ तासचे नवीन कार्यालय हे आता लोअर परळच्या मॅरेथॉन फ्यूचरेक्समध्ये स्थलांतरीत झाले आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीकडे आता जागतिक दर्जाचं आधुनिक तंत्रज्ञान असणारे स्टुडीओ आहेत. यामुळे प्रेक्षकांपर्यंत आणखी वेगाने बातम्या पोहोचवण्यास मदत होणार आहे.