'जेनेलिया देशमुख'ला कोर्टाची नोटीस

गृहविक्री करणाऱ्या एका कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले असून आंध्र प्रदेश हायकोर्टाने यासंदर्भात बुधवारी विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा किंवा तिच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Apr 18, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद 

गृहविक्री करणाऱ्या एका कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले असून आंध्र प्रदेश हायकोर्टाने यासंदर्भात बुधवारी विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा किंवा तिच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ते चट्टा तिरूपतैय्या यांचे वकिल बालाजी यांनी सांगितले, की २५ तारखेला जेनेलिया डिसूझालाही कोर्टासमोर उपस्थित राहावं लागेल. जेनेलिया संबंधित कंपनीची ब्रँड अँबेसॅडेर होती. बालाजी यांचं म्हणणं असं आहे, की जेनेलिया डिसूझाने ग्राहकांना कंपनीकडे आकृष्ट केलं असल्याने तीदेखील या फसवणुककर्त्यांपैकी एक मानण्यात यावी.

रियल इस्टेट कंपनी अंजनीपुत्र इंन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने ड्य़ुप्लेक्स फ्लॅट देण्यासंदर्भात ही जाहिरात होती. तिरुपतैय्या यांनी २००८ मध्ये ५४ लाख रुपये भरले होते. पण अजूनही हे फ्लट्स तयार नाहीत. म्हणून या कंपनीवर केस टकण्यात आली आहे.