Maharashtra Lok Sabha Election: सध्या देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहतायत. निवडणूकीपूर्वी प्रचारंही जोरदार केला जातोय. आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर पुढचा म्हणजेच तिसरा टप्पा 7 मे रोजी असून बारामती मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष आहे. या मतदार संघातून सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचारासाठी सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे मैदानात उतरली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच आपल्या आईसाठी रेवती सुळे देखील प्रचारासाठी मैदानात उतरली असल्याचं दिसून आलं.
लोकसभा निवडणूकांच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये मतदान होणार आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुलगी रेवती सुळे प्रचार करताना दिसली. यावेळी त्यांच्यासोबत चुलत भाऊ युगेंद्र पवारही उपस्थित होते. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूकीसाठी उभ्या आहेत. या जागेवर त्यांची स्पर्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्याशी आहे. या कारणामुळे बारामती हे महाराष्ट्राचे हॉट सीट मानलं जातंय.
बारामती मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सुप्रिया सुळे याठिकाणच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचारात कुटुंबीयही सहभागी झालेलं दिसतंय. यावेळी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण आनंदी आहे. सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर युगेंद्र पवार म्हणाला, माझं आमदार होण्याचं स्वप्न नाही. हे माझ्या मनात कधीच आलं नाही. दादा सहज बोलतात पण त्यांच्या प्रत्येक विधानाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही."