अहमदनगर इथेच ९ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कमी प्रवेशिका प्राप्त झाल्याचे कारण देत नगरच्या राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रद्द केलं होतं. नगरचे केंद्र रद्द झाल्याने स्पर्धेत सहभागी संघांना नाशिक केंद्रावर भाग घेण्यास सांगण्यात आलं होतं.
नाट्य संघाने तसेच खासदार दिलीप गांधी आणि पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी संदर्भात पाठपुरावा करत केंद्र रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न केलं. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि उपसंचालक मीनल जोगळेकर यांनी मान्यता दिली आहे. संचालनालयाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतीत निर्णय झाला असल्याचं आणि संघांना स्पर्धेच्या तारखेबाबत लवकरच कळवू असं उपसंचालक मीनल जोगळेकर यांनी सांगितलं आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयने २३ सप्टेंबर पर्यंत राज्य नाट्यस्पर्धे करता प्रवेशिका मागवल्या होत्या. नगरच्या ११ संघांनी मुदतीपूर्वी प्रवेशिक सादर करुन देखली चार संघाच्या प्रवेशिक मिळाल्या नसल्याचं कारण देत संचालनालयाने केंद्र रद्द केलं होतं.