...अमिताभला धक्का बसला

आय लव्ह यु रसना' म्हणारी तरुणी सचदेव हिची दुर्दैवी एक्झीट. विमान अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळताच बिग बी अमिताभ बच्चनला आपले दु:ख आवरता आले नाही. त्यांने ट्विटरवर दुखःद प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: May 16, 2012, 10:29 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

'आय लव्ह यु रसना' म्हणारी तरुणी सचदेव  हिची दुर्दैवी एक्झीट. विमान अपघातात  तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळताच  बिग बी अमिताभ बच्चनला आपले दु:ख आवरता आले नाही. त्यांने ट्विटरवर दुखःद प्रतिक्रिया दिली आहे.

 

गोंडस चेहरा आणि खोड्याळ अभिनयामुळे सगळ्यांची लाडकी झालेली बाल कलाकार तरुणी सचदेव दुर्दैवानं आता या जगात नाही. नेपाळच्या जॉमशॉममध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत तिचा आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. तरुणीनं आजपर्यंत अनेक जाहिरातींमध्ये अभिनय केला. त्याचबरोबर अमिताभच्या पा सिनेमात तिनं ऑरोच्या मैत्रिणीची भूमिकाही केली होती. तरुणीच्या अपघाती मृत्यूनंतर अमिताभनंही ट्विटरवर दुखःद प्रतिक्रिया दिलीय. विमान अपघातातील मृतांमध्ये तरूणीचे नाव वाचून मला धक्का बसला. मी जे ऐकतो ते खोटे ठरू दे, अशी मी देवाला प्रार्थना करीत होतो, असे बिग बी म्हणाला.

 

सध्या १० वीत शिकत असणा-या तरुणी सचदेवनं आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय. अतिशय कमी वयात ती जाहिरात जगतातला प्रसिद्ध आणि लाडका चेहरा ठरहली होती. तरुणी आणि तिच्या आईचा मृतदेह ताब्यात मिळाल्यनंतर बुधवारी मुंबईतल्या खारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तरुणीच्या अचानक जाण्यामुळे टीव्हीवरचा एक गोड चेहरा कायमचा हरपला आहे.