आता 'संत तुकाराम' भेटीला

आता ७५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘संत तुकाराम’ चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहेत. संत तुकारामांच्या जीवनावरील हा मराठी चित्रपट येत्या मेमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने संत तुकारामांची प्रमुख भूमिका केल्याची माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली.

Updated: Mar 1, 2012, 12:00 PM IST

www.24taas.com,  मुंबई

आता ७५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘संत तुकाराम’ चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहेत. संत तुकारामांच्या जीवनावरील हा मराठी चित्रपट येत्या मेमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने संत तुकारामांची प्रमुख भूमिका केल्याची माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली.

‘प्रभात फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेला ‘संत तुकाराम’ हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला होता. आता हाच चित्रपट नव्या रूपात मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजित दळवी-प्रशांत दळवी यांनी यासंदर्भात संशोधन करून पटकथा लिहिली असून सन १६०८ ते १६५० सालापर्यंतचा काळ पडद्यावर साकारण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे. हा चित्रपट अमराठी प्रेक्षकांनाही समजेल असा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे निर्माते संजय छाब्रिया  यांचे म्हणणे आहे.  अशोक पत्की-अवधूत गुप्ते हे चित्रपटाचे संगीतकार असून काही गाणी कवी दासू वैद्य यांनी लिहिली आहेत. तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे करणार आहे. त्याशिवाय वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर यांच्याही यात भूमिका आहेत.