एकता कपूर ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ - केआरके

यावेळी केआरकेने असंच वक्तव्य करून त्याने महेश भट्ट आणि एकता कपूरवर वार केला आहे. केआरकेने ट्विट केलंय, “एकता कपूरजींना रागिणी एमएमएस, क्या सुपरकूल है हम यांसरखे सर्वांत डर्टी सिनेमे निर्माण करून हिट केल्याबद्दल ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ असा सन्मान करायला हवा.”

Updated: Jul 4, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

कमाल राशीद खान ऊर्फ केआरकेने वाट्टेल ते ट्विट करत लोकप्रियता कमावली. कधी सचिन तेंडुलकर, कधी करीना कपूर तर कधी सनी लिऑन यांच्याबद्दल वाट्टेल ती वक्तव्य करून केआरकेने आपलं ज्ञान इंटरनेटवर पाजळलं आहे.

यावेळी केआरकेने असंच वक्तव्य करून त्याने महेश भट्ट आणि एकता कपूरवर वार केला आहे. केआरकेने ट्विट केलंय, “एकता कपूरजींना रागिणी एमएमएस, क्या सुपरकूल है हम यांसरखे सर्वांत डर्टी सिनेमे निर्माण करून हिट केल्याबद्दल ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ असा सन्मान करायला हवा.”

एकता कपूर सेक्स प्रमोट करतेय असं सांगताना केआरकेने लिहिलं, “भारतातल्या घराघऱांत सेक्स पसरावा आणि त्यातून क्या सुपरकूल है हम सुपरहिट व्हावा अशी एकता कपूरने शपथच घेतली असावी.” एवढंच नव्हे तर केआरके पुढे म्हणाला, “जर महेश भट्ट यांना देशाचा राष्ट्रपती आणि एकता कपूरला पंतप्रधान केलं तर रोज सकाळी सनी लिऑनसारख्या १००० पॉर्न स्टार्स इंडिया गेटवर परेड करतील ”

केआरकेची आगपाखड अक्कलशून्य मानली, तरी त्याचे आरोप अगदीच निराधार नाहीत, नाही का?