www.24taas.com, मुंबई
चंदेरी दुनियामध्ये काय चाललयं, याच्यावर एक दृष्टीक्षेप. या आठवड्यात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे २ हिंदी आणि १ मराठी सिनेमा. त्यामुळे आठवड्याच्या चंदेरी दुनियेत रसिकांना ही मेजवानी असणार आहे. तर कोणाची दोस्ती कशी आहे. कोण आहे कोणाचा फॅन आणि अभिनेत्यांना काय आवडत नाही आणि आणखी काही बरचं...याबाबतच्या चंदेरी दुनियेतल्या घडामोडींवर घेतलेला थोडक्यात आढावा.
महेश भट्ट निर्मित ब्लड मनी हा थ्रीलर सिनेमा.. एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा या सिनेमात रेखाटण्यात आलीय. तर भ्रष्टाचाराची कथा मांडण्यात आलीय चिरगुट या सिनेमात.. उपेंद्र लिमये, चिन्मय मांडलेकर, सिया पाटील या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.. तर बम्बू हा कॉमिक पण थ्रीलर सिनेमाही आज शुक्रवारी रिलीज होत आहे.
महेश भट्ट यांच्या ब्लड मनी मध्ये दोन हॉट किसिंग आणि इंटीमेट सीन आहेत. या हॉट सीनची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे बोल्ड पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यातील नायक कुणाल खेमला उघडा दाखवण्यात आला आहे. त्याच्या भोवती बिकनीतील हसीना दाखवण्यात आल्या आहेत. तर या चित्रपटात स्विमिंग पुलमध्ये पाण्याऐवजी पैसा दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात अमृता पुरीची भूमिका आहे. त्यामुळे हॉट सीन असलेल्या या चित्रपटाचा बोलबाला पोस्टरवरून झाला आहे.
सलमान आणि अजय देवगण यांची सध्या घट्ट मैत्री आहे. याच दोस्तीखातर सलमान अजय देवगणच्या नेक्स्ट फिल्ममध्ये आयटम नंबर करणार आहे. एवढंच नाही तर या गाण्यासाठी तो एकही पैसा घेणार नाही. अर्थात यामुळे सध्या हे दोघे बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तर दबंगमध्ये झळकलेली ज्युनियर शॉर्टगन सोनाक्षी आणि सल्लूमिया दबंग सिक्वलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत... ही जोडी शिरीष कुंदेरच्या किक या आगामी सिनेमातदेखील एकत्र झळकणार आहे.. एकातरी फिल्ममध्ये सलमानसोबत झळकावं असं आजकालच्या अभिनेत्रींचं स्वप्न आहे आणि सोनाक्षी तर हॅटट्रिक करण्याच्या मार्गावर आहे. एकंदर सोनाक्षीला सलमान खान फारच लकी ठरलाय असंच म्हणायला हवं.
रणबीर कपूरचे अनेक चाहते आहेत आणि आता यात आणखी एका चाहत्याची भर पडलीय ती म्हणजे अभिनेता परेश रावल.. कारण, बॉलिवूडचे भविष्य काय असे विचारताच परेश रावल यांनी उत्तर दिले रणबीर कपूर...रणबीरमध्येच त्यांना बॉलिवूडचं भवितव्य दिसतंय..रणबीरच्या अभिनयाचे ते मोठे फॅन आहेत. तर सिल्व्हर स्क्रीनवर मोठमोठे स्टण्ट्स करणा-या अक्षयकुमारला वास्तवात मात्र अजिबात हिंसा आवडत नाही... त्याबाबतीत अक्की पूर्णत गांधीवादी आहे... हिंसेने कधीच कोणाचं भलं होऊ शकत नाही तर हिंसा हे सर्वनाशाचंच प्रतीक आहे असं तो बोलतो.. प्रेमानेच जग जिंकता येतं असा अक्कीचा ठाम विश्वास आहे.
तनू वेड्स मनूचा सिक्वल येणार की नाही याबद्दल ब-याच वावड्या उठत होत्या.... मध्यंतरी हा सिक्वल येणार नाही अशा चर्चेला ऊत आला होता.. पण हे सारं खोटं आहे असं खुद्द दिग्दर्शक आनंद राय यांनी स्पष्ट केलंय.. सध्या बाकी फिल्म्स करत असल्यामुळे सिक्वलच्या तयारीला वेळ मिळत नाहीए पण पुढील वर्षी तनू वेड्स मनूच्या सिक्वलची तयारी सुरु होईल असा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.
सावरकरांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला ही देशभक्तीपर कविता भरत बलवल्ली या तरुण संगीतकारानं नव्या को-या चालीत बांधण्याचा प्रयत्न केलाय. या संगीत अल्बमसाठी दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांचं संगीत संयोजन लाभलंय. संगीत दिग्दर्शनाचा भरतचा हा पहिलाच अनुभव आहे. या उपक्रमातून भरत सावरकरांच्या एक नाही दोन नाही तर तब्बल ३१ कवितांचा संच घेऊन येत आहे.