'बर्फी'मधलं अनोखं कपल

एका अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने शाहरुखची कॉपी केली होती. प्रियांकाची ही नक्कल सगळ्यांचीच 'वाह वाह' मिळवून गेली होती. अगदी ्याच प्रकारची भूमिकाच आता प्रियंका करणार आहे. या रुपात याआधी देसी गर्लला कुणीही बघितलेलं नाही.

Updated: Nov 4, 2011, 11:54 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'बर्फी'  या आगामी फिल्ममध्ये प्रियांका ऑटिस्टीक आजाराने त्रस्त झालेल्या मुलीच्या भूमिकेत झळकणारेय. ही प्रियांका कुणाचं म्हणणं समजूही शकत नाही आणि कुणाला आपलं म्हणणं पटवूनही देऊ शकत नाही. लूझ कपडे, विस्कटलेले छोटे केस असा प्रियंकाचा या चित्रपटातला लूक आहे.  या रुपात याआधी देसी गर्लला कुणीही बघितलेलं नाही. या आजाराने त्रस्त असलेल्या पेशंटची भूमिका शाहरुखने 'माय नेम इज खान'मध्ये साकारली होती. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने त्याचीच कॉपी केली होती. प्रियांकाची ही नक्कल सगळ्यांचीच 'वाह वाह' मिळवून गेली होती. अगदी ्याच प्रकारची भूमिकाच आता प्रियंका करणार आहे.

 

या सिनेमात प्रियांका रणबीरबरोबर बोलतानाही दिसणार नाही. त्याचं कारण म्हणजे 'बर्फी'मध्ये रणबीर साकारत आहे मुकबधिर तरुण. एकुणच ही बर्फी ऑटीझमने त्रस्त असलेल्या मुलीची  आणि मुकबधिर तरुणाची प्रेमकहाणी असणार आहे.