www.24taas.com, मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पोटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांच्या पोटात पुन्हा दुखत असल्याचे वृत्त होते. त्यांना पुन्हा सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले असले तरी त्यांच्यावर आणखी शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वी डिसचार्ज दिला होता. मात्र, नवीच दुखणी निदर्शनास आल्यामुळे, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढणार आहे, असे वृत्त होते. अमिताभच्या पोटात दुखू लागल्याने लिलावती रुग्णालयात त्याचं चेकअप करण्यात आलं. 'कुली' सिनेमादरम्यान पोटात झालेल्या दुखापतीमुळेच ही शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं होतं. कुली सिनेमामध्ये एका मारामारीच्या सिनमध्ये फाईट चुकवण्यासाठी अमिताभ यांना टेबलाचा पत्रा पोटाला लागल्याने त्यांच्या आतडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून बिग बी बऱ्यापैकी सावरले मात्र अधूनमधून त्यांना पोटाची व्याधी त्रास देत असते.
याआधीही 'बिग बी' वर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा पोटाचा त्रास उद्भवल्यानेच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच ही शस्त्रक्रिया गंभीर स्वरुपाची नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बिग बींनी आज गुरूवारी त्यांच्या दुखण्याबद्दल ट्विट केले आहे. नव्या दुखण्यांचे तपशील मी देऊ शकत नाही. मी माझ्या दुखण्यावर आणि उपचारांवर संपूर्णपणे लक्ष केंद्रीत करत आहे.