www.24taas.com, इंदौर
आजकाल बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी अभिनेत्रींचं खान कनेक्शन खूप उपयोगी पडत असल्याचं दिसून येत आहे. याच गोष्टीची खिल्ली उडवताना अभिनेत्री उदिता गोस्वामी म्हणाली की ती आपल्या नव्या कुत्र्याचं नाव ‘खान’ असं ठेवणार आहे.
‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ के च्या प्रचारासाठी आलेल्या उदिताने पत्रकारांना सांगितलं, “मी माझ्या कुत्र्याला आडनावही देते. माझ्या एका कुत्र्याचं नाव मिमी गोस्वामी ठेवलं आहे. तसंच माझ्या नव्या कुत्र्याचं नाव मी ‘खान’ ठेवेन. म्हणजे माझंही नाव ‘खान’ कंपनीशी जोडलं जाईल. कारण हल्लीच्या सर्वच अभिनेत्री आमिर खान, सलमान खान किंवा शाहरुख खान या खान लोकांसोबत राहूनच यशस्वी झाल्या आहेत.”
उदिता २००३मध्ये ‘पाप’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आली होती. तिला सिरीयल किसर इमरान हाश्मीबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “इमरानच्या पडद्यावरील इमेजमुळे अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला तयार नाहीत, असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण, हल्ली इमरानपेक्षा या अभिनेत्रीच जास्त किसींग सीन्स देत असतात.”