आराध्या प्रदर्शनाची वस्तू नाही - अभिषेक

‘माझी मुलगी म्हणजे काही प्रदर्शनाची वस्तू नाही’ असं म्हटलंय आराध्या बच्चनच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन यानं.

Updated: Jul 4, 2012, 05:40 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

‘माझी मुलगी म्हणजे काही प्रदर्शनाची वस्तू नाही’ असं म्हटलंय आराध्या बच्चनच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन यानं.

 

चाहते आणि मीडियाला भले अभिषेक-ऐश्वर्याच्या छोट्या परीला बघण्याची खूप घाई झाली असेल किंबहुना आहेच... पण अभिषेकला मात्र आपल्या मुलीला सामान्य मुलांसांरखंच बालपण द्यायचंय. आणि याची तो खूप सिरीयसली काळजी घेतोय. दिखावूपणापासून दूर ठेऊन तिलाही दिखावा बनण्यापासून त्याला वाचवायचंय. अभि म्हणतो, ‘आराध्याचे माता-पिता आणि आजी-आजोबा भले सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असतील पण माझी मुलगी मात्र नाही. आणि तिला तसंच राहू द्या. मी या इंडस्ट्रीमध्ये लहानाचा मोठा झालोय आणि मला लोकांना असलेल्या उत्सुकतेची कल्पनाही आहे. पण, माझी मुलगी प्रदर्शनाची वस्तू नाही’.

 

२००७ मध्ये अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्यानं आराध्याच्या जन्माची गोड बातमी दिली. अभि सध्या आपल्या आगामी सिनेमा ‘बोल बच्चन’च्या प्रचारात बिझी आहे. आपण हा सिनेमा खूप विचाराअंती स्विकारल्याचं त्यानं म्हटलंय. हा सिनेमा म्हणजे सुट्ट्या घालवण्यासाठी एक चांगली संधी त्याला वाटली. पण, त्यानंतर मात्र त्यानं म्हटलंय, ‘की ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका बनलीय. या आधीचे लागोपाठ दोन एक्शन फिल्म केल्यानंतर मला कॉमेडी सिनेमामध्ये काम करायचं होतं. पण, हा कॉमेडी सिनेमा केल्यानंतर मला समजतंय की, असे सिनेमे करण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते आणि म्हणूनच मी आता खूप थकलोय.’