'शर्यत'चा म्युझिक लाँच

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

Updated: Dec 3, 2011, 06:01 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

16 डिसेंबरला शर्यत हा नवा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येतोय. त्यापुर्वी या सिनेमाचं म्युझिक लाँन्च करण्यात आलं.

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. सचिन-सुप्रियाच्या हस्ते हे म्युझिक लॉन्च करण्यात आलं. कथानकाला साजेशी अशी सिनेमातली  गाणी असून चिनार-महेश या जोडीने संगीत दिलंय. या सिनेमात खास भार्गवी चिरमुलेवर एक लावणी पिक्चराईज्ड करण्यात आलीय तर तडफदार आयटम साँगवर नेहा पेंडसेने ताल धरलाय. शिवाय संतोष आणि तेजश्रीचं एक रोमॅण्टीक साँगही या सिनेमात आहे.

सचिन पिळगांवकर, उर्मिला धनगर, स्वप्निल बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर यांनी सिनेमातल्या गाण्यांना स्वरसाज चढवलाय...

 

विजु माने दिग्दर्शित या सिनेमातली गाणी पाहिली-ऐकली तर सिनेमाने गाण्यातली शर्यत आधीच जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र प्रेक्षकराजाच्या मनातली ही शर्यत कशी रंगतेय तेच पाहाचंय.