शशी कपूर यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी आणि शशी कपूर यांनी दिवार आणि नमक हलाल सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात एकत्र काम केलं आहे.

Updated: Mar 18, 2012, 04:15 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी आणि शशी कपूर यांनी दिवार आणि नमक हलाल सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात एकत्र काम केलं आहे.

 

शशी कपूर यांनी बाल कलाकार म्हणून आग या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. जब जब फूल खिले, प्यार का मौसम, एक श्रीमान एक श्रीमती, हसिना मान जायेगी आणि शर्मिली हे शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे होय.

 

शशी कपूर गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी शम्मी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस हजर होते. पण गेल्या वर्षभरात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत.