'टुरींग टॉकीज'साठी तृप्तीचा नवा मेकओव्हर

मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या प्रयोगांमुळे तृप्ती भोईरचं नाव नेहमीच चर्चेत असतं. अभिनेत्री आणि निर्माती असेलली तृप्ती पुन्हा एका नव्या प्रयोगासाठी सज्ज झालीय. आपल्या ‘टुरिंग टॉकीज’ या सिनेमासाठी तृप्तीने नुकताच मेकओव्हर केला आहे.

Updated: Mar 17, 2012, 09:29 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या प्रयोगांमुळे तृप्ती भोईरचं नाव नेहमीच चर्चेत असतं. अभिनेत्री आणि निर्माती असेलली तृप्ती पुन्हा एका नव्या प्रयोगासाठी सज्ज झालीय. आपल्या ‘टुरिंग टॉकीज’ या सिनेमासाठी तृप्तीने नुकताच मेकओव्हर केला आहे.

ग्लॅमरच्या विश्वात वावरणारी तृप्ती या सिनेमात रस्तावरची ‘चांदी’ बनली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज या सिनेमासाठी तृप्तीनं मेकओव्हर केला आहे. ‘अगडबम’ या सिनेमातून यापूर्वी मेक-ओव्हरचा आगळा वेगळा प्रयोग अभिनेत्री निर्माती तृप्ती भोईरनं केला. मराठी सिनेमात अशा प्रकारचा प्रयोग करुन तृप्तीनं आपली दखल मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांनाही घ्यायला लावली. त्यानंतर ‘हॅलो जयहिंद’ हा सिनेमा तृप्तीनं केला. त्यातही तिनं आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलंय.

 

आता तृप्ती पुन्हा एकदा वेगळा प्रयोग करणार सज्ज झाली आहे. अगदी बारीक कापलेले केस, चेहऱ्यावर असलेला बेरका भाव आणि हुबेहूब मुलगा वाटावा असा पेहराव तिने परिधान केला आहे. तर दिग्दर्शक गजेंद्र अहिरेही तृप्तीच्या या मेकओव्हरवर भलतेच खूश झाले आहेत. आता पाहुयात तृप्तीची चांदी प्रेक्षकांना भावतेय का ते ?

Tags: