सलमानच बॉलिवूडचा 'दबंग'

सलमान खानच्या दबंग 2 या सिनेमाचे हक्क १४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. दबंग २ ने किंग खानच्या रा-वनला मागे टाकत बॉलिवूडमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.

Updated: Feb 6, 2012, 05:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 
सलमान खानच्या दबंग 2 या सिनेमाचे हक्क १४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. दबंग २ ने किंग खानच्या रा-वनला मागे टाकत बॉलिवूडमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. भारतात मल्टीप्लेक्स संस्कृतीचा उदय आणि १२,००० सिंगल स्क्रिन थिएटर्समुळे हिंदी सिनेमाने गेल्या काही वर्षात उलाढालीत कोटीच्या कोटी रुपयांच्या व्यवहारांची भरारी मारली आहे. हिंदी सिनेमा दर तिमाहीला बॉक्स ऑफिस क्लेक्शनमध्ये नव्या विक्रमांची नोंद करत आहे.

 

अग्निपथेने नुकताच १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. सलमान खानचा दबंग 2 चे हक्क युटीव्ही मोशन पिक्चर्सने १४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आजवर कोणत्याही हिंदी सिनेमाच्या हक्कांसाठी एवढी रक्कम मोजण्यात आली नव्हती. किंग खानचा रा-वन इरोस इंटरनॅशनलने १५० कोटी रुपयांना विकत घेतल्याची चर्चा होती पण नंतर निर्मात्यंनी एका निवेदना द्वारे अधिकृत आकडा १०० कोटी रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती दिली होती.

 

सलमान खानचे एक अभिनेता म्हणून वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध होतं असं या क्षेत्रातील जाणकार आमोद मेहरा यांनी म्हटलं आहे. सलमान खानने स्पर्धेला पिछाडीवर टाकलं असल्याचं मेहरा म्हणाले.